नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२५: दिवाळी उत्सवात खरेदीकरिता मेनरोड, रविवार कारंजा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने बुधवार (दि. १५) ते गुरुवार (दि. २३) पर्यंत सकाळी १० ते रात्री १० यावेळी रविवार कारंजा, मेनरोड, दहीपूल, शालिमार, नेपाळी कॉर्नर, सांगली बँक सिग्नल आदी ठिकाणी सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
प्रवेश बंद मार्ग: मालेगाव स्टँड ते रविवार कारंजाकडे येणाऱ्या मालवाहू वाहनांना, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉइंटकडे येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर भद्रकाली, बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग असे: मालेगाव स्टॅण्ड, मखमलाबादनाका, रामवाडी, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्स, गंगापूरनाकामार्गे, पंचवटीकडून मेन मार्केटकडे येणारी वाहने संतोष टी पॉइंट, द्वारकामार्गे, सीबीएस, शालिमारकडून जुने नाशिक परिसरात जाण्या-येण्यासाठी शालिमार, खडकाळी सिग्नल, दूध बाजार चौक अथवा गर्दीची ठिकाणे सोडून इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करतील.
पार्किंग व्यवस्था अशी: पे अँड पार्क सागरमल मोदी विद्यालय शालिमार, बी. डी. भालेकर मैदान, स्मार्ट सिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंग, गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली येथे वाहने पार्किंग करावे.
![]()
