नाशिक। दि. २६ ऑक्टोबर २०२५: महामार्गावरील इंदिरानगर बोगद्यावर गोविंदनगर व इंदिरानगर बाजूने ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हरचे बांधकाम महामार्ग प्राधिकरण विभागाकडून सुरू होणार आहे. यासाठी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक उड्डाणपुलाखालील बोगद्यातून जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
बंद प्रवेश मार्ग: साईनाथ नगर चौफुलीकडून गोविंदनगर सिटी सेंटर मॉलकडे जाणारी, मुंबईनाका बाजूकडील सर्व्हिसरोडने भुजबळ फार्म, लेखानगरकडे जाणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग असे: 1) साईनाथनगर सिग्नलकडून इंदिरानगर बोगद्याकडे येणारी वाहतूक ही इंदिरानगर बोगदा येथून डावीकडे वळून सव्हिर्सरोडने लेखानगरमार्गे इतरत्र जाईल. 2) सिटी सेंटर मॉल, गोविंदनगरकडून इंदिरानगर बोगद्याकडे जाणारी वाहतूक मनोहर गार्डन, इंदिरानगर बोगदा येथे डाव्या बाजूने वळून उड्डाणपूल पोल क्र. १७० येथून यूटर्न घेऊन इतरत्र जाईल अथवा सिटी सेंटर मॉल, गोविंदनगरकडून इंदिरानगर बोगद्याकडे जाणारी वाहतूक मनोहर गार्डन, इंदिरानगर बोगदा येथे डावीकडे वळून प्रकाश पेट्रोलपंप, मुंबईनाका सर्कलमार्गे इतरत्र जाईल.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790