नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अद्यापही तोडगा न निघू शकल्याने ते लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे ठिय्या आंदोलन संपेपर्यंत सीबीएस सिग्नल ते अशोकस्तंभपर्यंतचा स्मार्ट रोड सर्वप्रकाराच्या वाहतुकीसाठी दुतर्फा बंद करण्यात आला आहे. तर, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.
माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोमवारपासून (ता. २६) ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सदरील ठिय्या आंदोलन तोडग्या अभावी अद्यापही सुटू शकलेले नाही. त्यामुळे ठिय्या आंदोलन लांबण्याची चिन्हे असल्याने, अशोकस्तंभ ते सीबीएस सिग्नल या स्मार्टरोडवरील वाहतूक आंदोलन संपेपर्यंत बंद करण्यात आलेली आहे.
पर्यायी मार्ग:
📌 सारडा सर्कल ते शालिमारकडे येणारी वाहतूक ही खडकाळी सिग्नलमार्गे मोडक सिग्नल, जलतरण तलाव सिग्नल मार्गे इतरत्र वळविण्यात आली आहे.
📌 मोडक सिग्नलकडून येणारी वाहतूक सिबीएस सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन टिळकवाडी सिग्नलकडे मार्गस्थ
📌 गंगापूर रोडने रविवार कारंजाकडे व पंचवटीकडे येणारी वाहतूक जनावरांचा दवाखाना ते घारपुरे घाटाने अशोकस्तंभमार्गे रामवाडी पुलावरून पंचवटीकडे मार्गस्थ.
📌 पंचवटीकडून रविवार कारंजाकडे व पंचवटीकडे येणारी वाहतूक मालेगांव स्टॅण्ड येथून मखमलाबाद नाका-रामवाडी मार्गे चोपडा लॉन्सकडे मार्गस्थ
📌 कॅनडा कॉर्नरकडून सिबीएसकडे येणारी वाहतूक राणे डेअरी – मॅरेथॉन चौकमार्गे, तसेच टिळकवाडी, रामायण बंगला, जलतरण सिग्नलमार्गे मार्गस्थ.