नाशिक: श्रमिक सेनेचे मंगळवारी आंदोलन; रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक सेवा राहणार बंद

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, तसेच ट्रक चालकांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता.१२) श्रमिक चालक-मालक सेनेतर्फे प्रलंबित व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

आंदोलन दरम्यान सकाळी ११ ते ५ या वेळेत रिक्षा, टॅक्सी सेवा बंद करणार आहेत.

श्रमिक सेनेतर्फे रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक यांनी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, त्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. परिणामी चालक आणि मालक भरडला जात आहेत.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

परंतु शासन मात्र उदासीन आहे. परिणामी प्रलंबित व इतर विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळी ११ ते ५ यावेळेत श्रमिक सेना संस्थापक सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागूल, मामासाहेब राजवाडे, शंकर बागूल, नवाज सय्यद, राजेंद्र वागले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक आंदोलन करणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790