नाशिक: भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत दोघे ठार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-सय्यद प्रिंपी रस्त्यावर भरधाव वेगातील आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले तर, १४ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.

याप्रकरणी ट्रकचालक संशयित मधुकर संतू संगमनेरे (रा. मारुती मळा, खेरवाडी, ता. निफाड) यांच्याविरोधात नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर तुकाराम राऊत (३०), शंकर तुकाराम आव्हाड (३२, दोघे रा. म्हाडा कॉलनी, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, नाशिक) असे अपघातात मयत झालेल्यांची नावे असून, जुबेर रहीम खान (१४, रा. पाथर्डी फाटा, इंदिरानगर) हा जखमी झालेला आहे. रामेश्वर राऊत, शंकर आव्हाड आणि जुबेर खान हे तिघे दुचाकीवरून (एमएच १५ सीएल ०३५७) नाशिककडून सय्यद प्रिंपीकडे जात होते.

हे ही वाचा:  खळबळजनक! पंचवटीतील तरुणाचा हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला

त्याचवेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने (एमएच १५ जेसी ६७०३) दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील रामेश्वर व शंकर हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. तर जुबेर हा गंभीररित्या जखमी झाला आहे. सदरचा अपघात शुक्रवारी (ता.८) रात्री पावणेआठ वाजता झाला.

याप्रकरणी रामचंद्र तुकाराम आव्हाड यांच्या फिर्यादीनुसार संशयित ट्रकचालक मधुकर संगमनेरे यांच्याविरोधात नाशिक तालुका पोलिसात मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास जोपळे हे करीत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790