Amazon

नाशिक: दुर्दैवी; कार रिव्हर्स घेतांना धडक बसल्याने ३८ वर्षीय महिला ठार

नाशिक (प्रतिनिधी): लामखेडे मळा भागात कार रिव्हर्स घेतांना धडक बसल्याने ३८ वर्षीय महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सुनिता भास्कर शेखरे (रा. देवी मंदिराजवळ, वज्रेश्वरीनगर दिंडोरीरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक काकाजी काळे यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. निष्काळजीपणे कार चालवणा-या कारचालकास अटक करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत शेखरे या रविवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास लामखेडे मळा भागात गेल्या असता ही घटना घडली. बेकरी जवळून त्या पायी जात असतांना पाठीमागे भरधाव आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. चालकाने निष्काळजीपणे कार रिव्हर्स मध्ये घेतल्याने हा अपघात झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार; सोमवारी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिता शेखरे यांचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी कारचालक मनिष बाळू गवळी (रा. महाराणा प्रताप नगर, दिंडोरी रोड) यास ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790