नाशिक (प्रतिनिधी): पोलीस आयुक्तालय नाशिक व नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 जून रोजी, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. नशेत अडकलेल्या लोकांचे जीवन वाचवण्यासाठी सायकल रॅली व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. सकाळच्या रम्य वातावरणात साडेसहा वाजता सायकलिस्ट मोठ्या संख्येने जमले.
सगळ्यांना ड्रग एडिक्शन थांबवा हा संदेश देणारा टी-शर्ट परिधान करण्यात देण्यात आला. वेलनेस टीमचे मच्छिंद्र पवार व टीमने संगीताच्या तालावर सर्वांचे वॉर्म अप करुन घेतले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आगमन होतात सर्वांनी टाळांच्या गजरात स्वागत केले. आपले शहर अमली पदार्थ मुक्त होण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व सायकलिस्टस् संदीप कर्णिक यांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या.
संदीप कर्णिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात झाली. पोलीस बँड च्या पथकाने सायकलिस्टला मोठी ऊर्जा दिली व उत्साह वाढवला. “भारत माता की जय”, “अमली पदार्थांची नशा आयुष्याची दुर्दशा”,”से नो टू ड्रग्ज एस टू लाईफ ” हे संदेश देत राईड मार्गस्थ झाली. रॅलीचा मार्ग: पोलीस आयुक्तालय – अशोक स्तंभ- रामवाडी – पेठ नाका- शरदचंद्र पवार मार्केट यार्ड- सिग्नल तारावाला नगर सिग्नल- दिंडोरी नाका- पंचवटी कारंजा- रविवार कारंजा -रेड क्रॉस सिग्नल- शालीमार -द्वारका -काठे गल्ली सिग्नल- सह्याद्री हॉस्पिटल- मुंबई नाका- गडकरी चौक- त्रंबक नाका – पोलीस परेड ग्राउंड असा होता.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जनजागृती पर काढण्यात आलेली ही रॅली सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे ठरली. पोलीस परेड ग्राउंड येथे रॅलीची सांगता झाल्यानंतर पोलीस बँडने अनोखे स्वागत केले. भीष्मराज हॉल समोरील स्टेजवर रॅलीची सांगता झाल्यानंतर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले.
नाशिक साईट लिस्ट फाउंडेशनच्या सहकार्याने रॅली यशस्वीरित्या पार पडली त्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष डॉ. मनिषा रौंदळ, माजी अध्यक्ष प्रवीण कुमार खाबिया, राजेंद्र वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमास विशेष सहकार्य ब्लिस इंफ्युजन अँड सर्जिकल चे सागर मुंदडा व सिद्धिविनायक फार्माचे चेतन भामरे यांचे लाभले त्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या टीमने मादक पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, तसेच युवक युवतींना कशा प्रकारे ड्रग एडिक्शन होते व मादक पदार्थांच्या विळख्यात पडतात याबद्दल प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. पथनाट्यात डॉ. मनिषा रौंदळ ,माधुरी गडाख, साधना दुसाने ,मोहन देसाई ,सुगंधा व्यवहारे, अश्विनी कोंडेकर, मनिषा पवार व वैशाली शेलार यांनी उपस्थित सर्वांच्या मनापर्यंत भावना व विषय पोहोचेल असे सादरीकरण केले. आयुक्त साहेबांनी पथनाट्य टीमचा विशेष सत्कार व कौतुक केले.
तसेच अशाप्रकारे प्रबोधनात्मक कार्यक्रम शाळा व कॉलेजमध्ये सातत्याने होणे गरजेचे आहे हे मत मांडले. उपस्थित सर्वांना कुठेही संशयास्पद मादक पदार्थांची विक्री होणे आढळल्यास वेळीच संपर्क साधण्याचे सुचित केले. उपस्थित सर्वांनी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी अमली पदार्थ विरोधी शपथ दिली. पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी केले. रॅलीचे नियोजन प्रवीण कोकाटे व डॉ. मनिषा रौंदळ यांनी केले. तसेच रॅलीसाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची सचिव संजय पवार, उपाध्यक्ष अरुण पवार, संचालक एस पी आहेर ,बजरंग कहाटे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक धनराज पाटील यांनी केले.