🌞 आजचे तापमान- किमान: १४.२°C । कमाल: ३१.३ °C
🪙 सोने: १,२४,५८०/१० ग्रॅम । चांदी: १,६५,०००/किलो

नाशिक: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दीड वर्षाच्या बाळासह आत्महत्या

निफाड (दीपक श्रीवास्तव): निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे राहणाऱ्या सुजाता भूषण निचीत या 27 वर्षीय नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या दिड वर्षीय बाळासह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याप्रकरणी मयत सुजाता चे वडील रामकृष्ण गाजरे यांनी निफाड पोलीस ठाण्यात आपल्या मुलीला सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदविली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून १.२२ कोटींची फसवणूक; सातपूरमधील संशयिताला अटक

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी रामकृष्ण प्रभाकर गाजरे यांची मुलगी सुजाता हिचा विवाह 19 जून 2019 रोजी सोनेवाडी बुद्रुक येथील भूषण निचित यांच्याशी झालेला होता. मात्र विवाह नंतर सातत्याने सासरी तिचा छळ केला गेला.

माहेरून पैसे आणावे, तसेच काम करत नाही, झोपून राहते अशा वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने तिला त्रास दिला जायचा. या त्रासाला कंटाळून सुजाता हिने दिनांक 25 जून 2024 रोजी रात्री चे सुमारास त्यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये आपला दीड वर्षाचा मुलगा गुरु भूषण निचीत याच्यासह उडी मारून आत्महत्या केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आरटीओ चलान’च्या नावाखाली फसवणूक; एपीके फाईल डाउनलोड करताच व्यावसायिकाला ४.५८ लाखांचा गंडा

या शेततळ्यामध्ये पाणी भरलेले असल्यामुळे चांदोरी तालुका निफाड येथून आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आलेले होते. या पथकातील स्वयंसेवक सागर गडाख बाळू आंबेकर सुरेश शेटे संतोष लगड आदींनी शेततळ्यामध्ये बुडालेल्या मायलेकाचे मृतदेह शोधून बाहेर काढले.

पोलिसांनी मयत सुजाताचा पती, सासू-सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी निफाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम आणि उपनिरीक्षक ईश्वर पाटील हे अधिक तपास करीत आहेत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790