नाशिक। दि. ५ ऑक्टोबर २०२५: शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्याकरता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर व परिसरात बॅनरबाजी करणाऱ्या भाईंना दणका देत गुन्हे दाखल केले. पंचवटी, अंबड, आडगाव, सातपूर, उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यांतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांच्या कारवाईत पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रीम कॅसल सिग्नलजवळ हनुमानवाडी येथे कुंदन परदेशी याने सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावत विद्रुपीकरणच करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सातपूर परिसरात जाधव कॉलनी, दत्त मंदिर चौक, अंबड लिंकरोड येथे राकेश सोनार याचा बॅनर काढण्यात आला.
नाशिकरोड परिसरात जेलरोड येथे दिनेश जाधव, बाळा जाधव दोघा भावांचे फलक काढण्यात आले. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेजिमेंटल प्लाझा कॉर्नर येथे गायकवाड मळा येथे करण पारचे याचा बॅनर काढला. अंबड परिसरातील महाकाली चौक येथे गणेश वाघ, राकेश कोष्टी यांनी विनापरवानगी लावलेले बॅनर काढण्यात आला.
![]()
