नाशिक: मुलीच्या कॅन्सर उपचारासाठी आणलेले पैसे रिक्षात विसरले, २ तासांमध्ये लावला शोध !

नाशिक (प्रतिनिधी): १० महिन्यांच्या मुलीच्या कॅन्सर उपचारासाठी आलेल्या पित्याचे रिक्षात विसरलेले पैसे अवघ्या दोन तासांत मिळून दिले. गुंडाविरोधी पथकाने रिक्षाच्या काचेवर लिहिलेल्या ‘जय मल्हार’ नावाच्या आधारे रिक्षा शोधून काढत पित्याकडे रक्कम दिली.

नितीन जाधव (रा. शिरपूर) हे त्यांच्या १० महिन्यांच्या मुलीला कॅन्सर उपचारासाठी आरटीओ येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. पुढील तपासणीसाठी राजीव गांधी भवन येथे जाण्यासाठी ते रिक्षात बसले. रिक्षा थांबा आल्यानंतर ते रिक्षातून उतरले, मात्र बॅग रिक्षातच विसरले. लॅबमध्ये पैसे देण्यासाठी बॅग पाहिली असता बॅग मिळून आली नाही. त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कोकण व उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा

रिक्षा नंबरही आठवत नसल्याने रिक्षा शोधण्याचे आव्हान होते. गुंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने रिक्षाची माहिती घेतली. रिक्षाच्या काचेवर जय मल्हार नाव असल्याचे जाधव यांनी सांगितले. पथकाने शहरातील प्रत्येक स्टॉपवरील सीसीटीव्ही तपासणी केली. आरटीओ परिसरात रिक्षाचा शोध घेतला. (एमएच १५ एफयू, १७२९) या रिक्षावर नाव आढळून आले. रिक्षा म्हसरुळ गावाकडे जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. पथकाने रिक्षाचा शोध घेतला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: गुजरातमधून नाशिकमध्ये तस्करी; साडेपाच लाखांचा गुटखा जप्त

रिक्षाची तपासणी केली असता रिक्षाच्या मागे हॉस्पिटलची फाइल, ३२ हजारांची रक्कम मिळून आली. जाधव यांना रक्कम व कागदपत्र ताब्यात दिले. पैसे परत मिळाल्याने जाधव यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. पथकाचे मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे यांनी ही कारवाई केली. पथकाचे आयुक्त संदीप कर्णिक यांनी अभिनंदन केले.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' सात जिल्ह्यांना आज (रविवार दि.१५ जून) पावसाचा ऑरेंज अलर्ट !

सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790