नाशिक: दोन दिवस वातावरण कोरडे; १९ नंतर पुन्हा थंडी वाढणार

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात आगामी दोन दिवस वातावरण कोरडे राहणार असून थोडा गारवा जाणवणार आहे. तसेच १९ जानेवारीनंतर थंडी पुन्हा वाढण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहून सायंकाळी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे. गुरुवारी राज्यात धुळ्यात सर्वात नीचांकी ११.८ किमान तापमान होते. निफाड १४.८, नाशिक १६.० तर छत्रपती संभाजीनगरला १६.५ अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी ३८५ किमी फायबर नेटवर्क; नाशिकच्या डिजिटल पायाभूत सुविधांना बळ
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790