नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बाबाज थिएटर्सच्या वतीने बुधवारी (दि. १) सांयकाळी ६.१५ वाजता ‘एक धागा सुखाचा’ हा सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी, व महेंद्र कपुर यांच्या अजरामर मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जेष्ठ नागरिक आणि सुजाण संगीत प्रेमींसाठी कुर्तकोटी सभागृह शंकराचार्य न्यास गंगापूर रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे.
यात सुनील आव्हाड, सुरेंद्र जालिहालकर, दीपक चौधरी आदी गायन करणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची असून संगीत संयोजन अमोल पालेकर यांचे आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्रितेश कुलकर्णी, योगिता पाटील, जे पी जाधव, शामराव केदार, दिलीप सिंह पाटील आणि एनसी देशपांडे यांनी केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790