नाशिक: ट्रिपलसीट, सिग्नल जंम्पिंग; १०५ चालकांकडून ६०,००० चा दंड वसूल !

नाशिक (प्रतिनिधी): सिग्नल जंम्पिंग, ट्रिपलसीट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर १०५ वाहतूक विभागाने कारवाई करत ६० हजार ५०० रुपये दंड आकारणी केली. सोमवारी (दि. २९) वाहतूक विभागाच्या पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड या ४ युनिटच्या पथकांनी ही कारवाई केली.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याकरता विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोमवारी वाहतूक विभागाच्या चार विभागांनी संयुक्त कारवाई केली. कारवाईची आकडेवारी अशी ट्रिपलसीट (१५ केसमध्ये १५ हजार दंड), सिग्नल जंम्पिंग (८९ केसमध्ये ४४ हजार ५०० दंड) आणि कर्णकर्कश सायलेन्सर १ केसमध्ये १ हजार दंड. अशा १०५ केसमध्ये ६० हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला.

Loading

हे ही वाचा:  नाशिकमध्ये आजपासून उष्णता लाटसदृश्य चिन्हे

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790