नाशिक: थकबाकीदारांनी वेळेत कर भरण्याचे मनपा आयुक्तांकडून आवाहन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका हद्दीतील थकबाकीदारांनी आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी वेळेत भरावी, ज्या मिळकतधारकांनी थकीत मालमत्ता कर अद्यापही भरणा केलेला नाही, अशा मिळकतधारकांची चलत अथवा स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

दरम्यान मालमत्ता कर थकबाकीदार करदात्यांकरीता, थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास, त्यांना लागू असलेल्या शास्ती व इतर फी मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ करीता ९५ टक्के सवलत व जोनवारी २०२५ करीता ८५ टक्के सवलत योजना राबविण्यात आली आहे. या सवलत योजनेचा लाभ ४१ हजाराहून अधिक मिळकतधारकांनी प्राप्त केला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

करदात्यांच्या सोईकरीता, मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याकरीता दि. ३१ मार्च २०२५ या कालावधीत सर्व शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व विभागीय कार्यालये व उपकार्यालयातील नागरी सुविधा केंद्र हे करांचा भरणा स्विकारण्याकामी नियमितपणे कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात आले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

सर्व थकबाकीदार करदात्यांकरीता, सवलतीची शेवटची संधी असल्याने या संधीचा लाभ घेण्यात यावा, अन्यथा सवलतीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर नाईलाजास्तव अधिनियमातील तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करण्यात येईल, याची थकबाकीदार करदात्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790