
नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२५: गोविंदनगरच्या लेन नंबर तीनमध्ये सोमवारी रस्ता खडीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. पाच वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याने रहिवाशांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानले.
गोविंदनगरच्या लेन नंबर तीनमध्ये भावसार भवनजवळील रस्ता पूर्णपणे नादुरुस्त होता. मोठा उतार आणि खड्डा असल्याने सतत पाणी साचत होते. यामुळे वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाने साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाले होते. दुचाकी घसरून अपघातही होत होते.
धरमचंद चौधरी, दिनेश राका, मधुकर कलाल यांच्यासह रहिवाशांनी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्याशी संपर्क साधला. दोन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर सोमवारी, १७ नोव्हेंबर रोजी रस्ता खडीकरण कामाला सुरुवात झाली. मोहनलाल पंजाबी, दिनेश राका, धरम चौधरी, अजित सिंग, मधुकर कलाल, ज्ञानेश्वर कर्पे, आदित्य कर्पे, पूर्वा निकम, सोनिया चौधरी, निता चौधरी, स्वाती चौधरी, पल्लवी कर्पे, अंकिता कर्पे, शीला कर्पे, अपर्णा डापसे, सुरेखा देऊलकर, सुनील कोळी, राहुल आव्हाड आदींसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
![]()
