नाशिक (प्रतिनिधी): सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे शनिवारी (ता. १५) सायंकाळी सहा वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ‘स्वर सावाना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार तसेच अभिजात संगीताची जपणूक, कलाकारांना व्यासपीठ आणि सुजाण संगीत प्रेमी रसिकांना आनंद देणे, या हेतूने संस्थेच्यावतीने ‘स्वर सावाना’ या सांस्कृतिक (सांगितिक) कार्यक्रमाचे आठवे पुष्प राग-रंग शास्त्रीय, उपशास्त्रीय अभंग नाट्य संगीत गायक हर्षद गोळेसर (शास्त्रीय संगीत अध्यापक, गायक) यांना साथ करणार तबला व्यंकटेश तांबे, हामोर्नियम – संस्कार जानोरकर, तानपुरा विकास चव्हाण, साउंड सचिन तिडके यांची असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटील, अध्यक्ष प्रा. दिलीप फडके उपस्थितीत राहणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, जयेश बर्वे, गिरीश नातू, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, सुरेश गायधनी, प्रेरणा बेळे, डॉ. धर्माजी बोडके, प्रा. सोमनाथ मुठाळ, मंगेश मालपाठक, प्रशांत जुन्नरे, अॅड. भानुदास शौचे यांनी केले.