नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला गुरुवारी (दि. २८) नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
परशुराम साई खेडकर नाट्यगृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी (दि.२४) डिसेंबरपर्यंत सायंकाळी सात वाजता नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यंदा एकूण २७ नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
गुरुवारी (दि.२८) सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल. उद्घाटनानंतर अंबिका चौक सेवाभावी संस्थेचे ‘संध्या छाया’ हे नाटक प्रथम दिवशी सादर होईल. नाट्यरसिकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता यावा यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि नाशिक केंद्राचे समन्वयक राजेश जाधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.