नाशिक: कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत हॉटेलमध्ये अ’ल्प’व’यी’न मुलीवर अ’त्या’चा’र

नाशिक: कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत त्र्यंबक रोडवरील हॉटेलमध्ये अ’ल्प’व’यी’न मुलीवर अ’त्या’चा’र

नाशिक (प्रतिनिधी): कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत एका अ’ल्प’व’यी’न मुलीवर अ’त्या’चा’र करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अ’त्या’चा’र केल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अत्याचार, बाल लैंगिक अ’त्या’चा’र प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  २ महिन्यांच्या मुलीची ५ लाखांत विक्री; नाशिकमधील आईसह ९ जणांना अटक !

या प्रकरणात संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

मजहर अन्वर खान (२६ रा.संजीवनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी चुंचाळे शिवारातील आंबेडकरनगर भागात राहणा-या १६ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि संशयित पूर्वी एकमेकांचे शेजारी राहत होते. २ एप्रिल २०२२ रोजी संशयिताने तिला गाठून कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत त्र्यंबकरोडवरील द ग्रेपसिटी या हॉटेलमध्ये नेले. याठिकाणी त्याने तिच्यावर ब’ळ’ज’ब’री’ने अ’त्या’चा’र केला. यानंतरही वेळोवेळी धमकी देत त्याने अ’त्या’चा’र सुरूच ठेवल्याने मुलीने आपबिती कुटुंबियांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन पवार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group