नाशिक (प्रतिनिधी): प्रख्यात गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त बाबाज थिएटर्सतर्फे शुक्रवारी (दि. ७) गाण्यांची विनामूल्य मैफल आयोजित करण्यात आली आहे. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान ही मैफल होईल.
सदर कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची असून या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सौ. उषा पाटेकर या त्यांची अजरामर गीते सादर करणार आहेत त्याचबरोबर शैलेंद्र बकरे आणि जयंत पाटेकर हे गायनाची साथ देणार आहेत, संगीत संयोजन “पाटेकर ब्रदर्स ” यांचे असून सूत्रधार राजा पाटेकर हे असणार आहेत, तरी या विनामुल्य कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी आवर्जून यावे असे आवाहन बाबाज थिएटर्स चे कैलास पाटील, सौ. योगिता पाटील, जे.पी.जाधव दिलीपसिंह पाटील,शामराव केदार, प्रा. प्रितिश कुलकर्णी , मिलिंद जोशी यांनी केले आहे