नाशिक : कोरड्या हवामानामुळे तापमान १ ते २ अंशाने वाढणार

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात सध्या हवामान कोरडे झाले असून नाशिकमध्ये आगामी तीन ते चार दिवस किमान आणि कमाल तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी नाशिकमध्ये किमान तापमान १४.६ तर कमाल ३१.१ होते. तसेच दोन दिवस उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात सकाळी हलक्या प्रमाणात धुके राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अटक टाळून मदतीसाठी ४ लाखांच्या लाचेची मागणी; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक

पश्चिम महाराष्ट्रात दुपारनंतर वातावरण काहीसे ढगाळ राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडीमध्ये चढउतार जाणवला असून गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात १ अंश सेल्सिअसने घसरण झाली होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

यामुळे तापमानात वाढ:
पश्चिमी झंझावात आणि पूर्वेकडील वाऱ्यांत बदलामुळे थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी. आर्द्रतेत वाढ. थंडीची लाट अल्पकाळ टिकली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790