नाशिक जिल्ह्यात 15 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे  कलम 37 (1) (3) अन्वये नाशिक ग्रामीण जिल्हा (पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांची हद्द वगळून) कार्यक्षेत्रात 1 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते  15 फेब्रुवारी 2025 रोजी  रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक परिक्रमा मार्गासाठी वरवंडी येथील खरेदी प्रक्रिया पूर्ण- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही असे आदेशात नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790