Amazon

‘बाबाज थिएटर्स’चा आज (दि. १) सन्मान सोहळा

नाशिक (प्रतिनिधी): बाबाज थिएटर्सच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्यांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शनिवारी (दि.१) रोजी सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोडवील शंकराचार्य न्यासमधील कुर्तकोटी सभागृहात हा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद; सिटीलिंकच्या बसमार्गांत महत्वाचे बदल

कार्यक्रमाचे हे ५१ वे पुष्प असून, पुरस्कारार्थीमध्ये स्वाती व सुहास आगरकर (क्रीडा), श्याम विसपुते (रंगकर्मी), सुवर्णा क्षीरसागर (संगीत) यांचा समावेश असून, प्रा. जयंत भातंबरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर किशोर कुमार यांच्या गाण्यांची मैफल रंगणार असून, वाद्यवृंद संयोजन अमोल पाळेकर यांचे, तर संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790