नाशिक: पार्सल पॉईंट येथे गॅस सिलिंडरचा भडका; दोन जण गंभीर जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील इंदिरानगरच्या कलानगर येथे एका पार्सल पॉईंट येथे आज (दि. १ जानेवारी २०२४) सकाळच्या सुमारास गॅसचा भडका होऊन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना नाशिकचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

इंदिरानगर परिसरातील कलानगर चौकात वक्रतुंड पार्सल पॉईंट येथे ही घटना घडली आहे. या दुकानात रविवारी रात्री गॅस लीक झाला असावा अशी शक्यता आहे.

सकाळी दुकान उघडल्यानंतर दोन व्यक्तींनी इलेक्ट्रिक सप्लायचे बटन सुरु केले आणि मोठा भडका झाला.

यानंतर दुकानात असलेले साहित्य लांब जाऊन पडले होते तसेच दोन जण देखील दुकानाबाहेर फेकले गेले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यास 'रेड अलर्ट'; अतिमुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क

रात्री गॅस लीक होऊन सकाळी बटण ऑन करताच स्पार्क होऊन हा भडका उडाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790