संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द कीर्तनकार व कवी ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर
नाशिक। दि.२२ जानेवारी २०२६: विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या मंचाच्या नाशिक शाखेच्या वतीने गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत नाशिक जिल्हास्तरीय समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात करण्यात आले आहे.
या समरसता संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द कीर्तनकार आणि कवी ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात राज्यभरातील ५१ कवींना काव्य सादरीकरणासाठी खास निमंत्रित करण्यात आले असून त्यांचा राज्यस्नरीय काव्यरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
गौरवपदक, महावस्त्र, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या संमेलनात उपस्थित कवी-लेखकांचा खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाचा विषय “मराठी साहित्याने मला काय दिले?” असा आहे. या संमेलनाच्या समारोप सत्रात “कविमनाची आरोळी …. विश्वात्मक चारोळी” अशी उत्स्फुर्त चारोळी सादरीकरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेनंतर दुपारी १ ते ३ या वेळेत जिल्हास्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातील सहभाग सर्व वयोगटातील कवी-लेखकांसाठी विनामुल्य असून सहभाग नावनोंदणीसाठी उपक्रम समन्वयक श्री. अनिकेत सुपेकर व्हॉटसअॅप क्रमांक ७४००४१५९१० यावर संपर्क करावा. ज्येष्ठ कवयित्री सौ. हेमलता गिते यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाची संयोजन समिती कार्य करत असल्याचे संयोजक शिवराज पाटील यांनी कळविले आहे.
![]()


