नाशिक, 17 नोव्हेंबर 2025: भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी तातडीने संयुक्त शोधमोहीम राबविली. मात्र, या तपासात परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
सावधगिरीचा उपाय म्हणून वनविभागाच्या पथकांकडून शाळेच्या परिसरात सतत गस्त सुरू ठेवण्यात आली आहे. शंका वाटणाऱ्या ठिकाणी आठ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जनजागृती सत्र घेण्यात आले. तसेच शाळा प्रशासनाकडून परिसरातील दाट गवत हटविणे व स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली आहे. रात्रीच्या वेळीसुद्धा थर्मल ड्रोन आणि इतर साधनांच्या साहाय्याने परिसरात पाहणी सुरू राहणार आहे.
नागरिकांना आवाहन:
वनविभागाने नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केले आहे की, कोणतीही अफवा पसरवू नये किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यास तत्काळ वनखात्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
![]()
