नाशिक: ऋतुरंग संस्थेतर्फे १३ पासून सांस्कृतिक महोत्सव

नाशिक। दि. ८ फेब्रुवारी २०२६: नाशिकरोड येथील ऋतुरंग संस्थेतर्फे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान दत्त मंदिर चौकातील ऋतुरंग भवनमध्ये कला व सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.

दुपारी चार ते रात्री आठदरम्यान रसिकांना चित्र, छंद, फोटोग्राफी अशा विविध कलांची मेजवानी मिळणार आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवणारे डॉ. प्रशांत वाघ यांचा दागिन्यांचा संग्रह, अनंत कुलकर्णी यांचा दौतीचा संग्रह, ओझरचे राजीव भालेराव यांचे जुने अडकित्ते आणि कुलपांचा

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

संग्रह रसिकांना पाहायला मिळेल. आर्किटेक्ट संग्राम गोवधर्ने यांची वन्यजीव छायाचित्रे स्वतंत्र दालनात पाहायला मिळतील. प्रसिद्ध चित्रकार धनंजय गोवर्धने, अशोक धिवरे, कैलास ह्याळीज, सुनील महामुनी, ऋषिकेश भंडारी यांनी रेखाटलेली विविध आकर्षक चित्रे बघता येतील. सायंकाळी गीत गायनाच्या मैफली होणार आहेत. बिझनेस बँक, दीपक बिल्डर्स आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हे या महोत्सवाचे आयोजक आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790