नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (८ जून २०२०) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक शहराची आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या: ४३०, एकूण मृत्यू: २१, घरी सोडलेले रुग्ण: १४८ आणि उपचार घेत असलेले रुग्ण: २६१ अशी झाली आहे. नाशिककरांनो खरोखरच काळजी घ्या आता..!
सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांची माहिती:
५,सुमंगल प्राईड, नेर्लीकर हॉस्पिटल जवळ, जेहान सर्कल, येथील २० वर्षीय युवक हा स्पेन येथुन नाशिक मध्ये दिनांक ३१ मे २०२० रोजी आला त्याला एका हॉटेल मध्ये कोरनटाईन करण्यात आले होते त्यास कोरोना बाबतचे कुठलेही लक्षणे नव्हती मात्र त्याचे स्वाब घेण्यात आले होते त्या स्वाबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
लोणार गल्ली,रविवार पेठ,नाशिक येथील १४ वर्षीय मुलगा हा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून हा नवीन रुग्ण आहे.
अभिजीत अपार्टमेंट, गुरुद्वारा रोड,शिंगाडा तलाव नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध यांना सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने त्यांचे स्वाब घेण्यात आले होते त्या स्वाबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.या सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाईकवाडी पुरा येथील ६२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला ५ जून २०२० पासून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांचे दिनांक ७ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.