नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; समुपदेशकाला पोलिसांकडून अटक

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामध्ये मानसिक संतुलन खराब झाल्याने समुपदेशकाकडे गेलेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. नंतर लग्नाचे आमिष दाखवून नाशिकसह परराज्यात नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल होऊन संशयित समुपदेशकाला अटक करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोएल जॉन्सन (२६, रा. ऋतु रिजन्सी, एनराईज बाय सयाजी हॉटेलच्या पाठीमागे, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित समुपदेशकाचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, कोरोना काळात मानसिक स्थैर्याच्या समस्येतून विवाहितेने सोशल मिडीयामार्फत संशयित काउन्सिलरशी संपर्क साधला होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

संशयिताशी कौन्सिंलिंगच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर संशयिताने प्रेमाचे नाटक करीत पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर गुजरात, केरळ व हैदराबाद येथील वेगवेगळ्या हॉटेल्सवर नेत बलात्कार केला तसेच मारहाणही केली.

तसेच, संशयिताने पीडितेला मारहाणही केली. हा प्रकार जानेवारी २०२१ ते जुलै २०२३ यादरम्यान घडला आहे. दरम्यान विवाहितेने पोलीसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७४/२०२३)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790