नाशिक: उपनगरला तरूणावर चाकू हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): उपनगर परिसरातील शांतीपार्क भागात जेवण आटोपून चौकात बसलेल्या तरूणावर एकाने चाकू हल्ला केल्याची घटना घडली.

या घटनेत २० वर्षीय तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी साहिल दामोधर खैरनार (रा.साई प्लाझा अपा.रामदास स्वामी नगर लेन.नं.२ उपनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या २ बांगलादेशींना अटक !

अंकुश डांगळे (रा. कांडप यंत्राजवळ,शांती पार्क उपनगर) असे तरूणावर चाकू हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. खैरनार रविवारी (दि.२) रात्री जेवण आटोपून चौकात गेले असता ही घटना घडली.

शांती पार्क येथील तिरूपती किरणा दुकानासमोरील कट्यावर तो बसलेले असतांना संशयिताने त्यास गाठले. यावेळी डांगळे याने विनाकारण शिवीगाळ केल्याने खैरनार याने त्यास जाब विचारला असता ही घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत भरावेत

संतप्त संशयिताने कमरेला लावलेला धारदार चाकूने खैरनार यांच्यावर हल्ला केला. या घटनेत पाठीवर वार करण्यात आल्याने खैरनार जखमी झाला असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790