नाशिक: पेठ रोडवर लूटमार करणाऱ्या सराईतास पोलिसांनी पकडले सिनेस्टाईल!

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी):  पंचवटीत कामानिमित्त अमरावतीवरून आलेल्या निमसरकारी कर्मचाऱ्याची लूटमार केल्याची घटना घडली होती.

मात्र, लूटमार करून पळणाऱ्या सराईतास पंचवटी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी (ता. ८) मध्यरात्री १ वाजता शरदचंद्र पवार मार्केट यार्डाजवळ घडली.

तक्रारदाराने ११२ नंबर डायल करताच पोलिसांनी कारवाई केल्याने पोलिसांच्या तत्काळ मदतीमुळे काही तासांत एक गंभीर गुन्हा उघड झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

अजय प्रकाश काळेकर (२३, रा. शरदचंद्र पवार मार्केट यार्डामागे, पंचवटी) असे सराईत संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद मोहनसिंग पाटील (३२, रा. फॉरेस्ट रेंजर कॉलेज, चिखलदरा, जि. अमरावती) हे काही कामानिमित्त नाशिकमध्ये आले होते.

गुरुवारी मध्यरात्री १ वाजता ते पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डाच्या गेटसमोरील एकलव्य निवासी शाळेजवळून पायी जात असताना संशयित काळेकर हा दुचाकीवरून (एमएच- १५- जीटी- ८४९८) आला.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

रस्त्याने कुणीही नसल्याची संधी साधत प्रमोद पाटील यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्याचवेळी काळेकरने बळजबरीने पाटील यांचा वीस हजारांचा मोबाईल फोन हिसकावून खिशातील दोन हजार ५०० रुपये सुद्धा काढून दुचाकीवरून पळून गेला.

भेदरलेल्या अवस्थेतील पाटील यांनी डायल ११२ वर कॉल करत माहिती दिली. माहिती समजताच वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेने सहाय्यक निरीक्षक मिथुन परदेशी आणि पंचवटी गुन्हे शोध पथकाचे हवालदार दीपक नाईक, अंमलदार नीलेश भोईर, संदीप माणसाने, विष्णू जाधव, घनश्याम महाले हे घटनास्थळी पोचले.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

तक्रारदार पाटील यांनी पळून गेलेल्या संशयिताचे वर्णन व दुचाकीचा नंबर दिल्यानुसार पथकाने पेट्रोलिंग करून शोध घेतला. संशयित वज्रेश्वरी नगराजवळून पळून जाताना दिसला. त्याचवेळी पथकाने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडून जबरीने चोरलेला मोबाईल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सराईत कोळेकरवर घरफोडी, जबरी चोरीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक परदेशी यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790