Breaking: गंगापूर रोडला ऑक्सिजन सिलेंडरचा मोठा स्फोट; आजूबाजूच्या घरांच्या काचाही फुटल्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर आज स्फोटानं हादरलंय. गंगापूर रोड येथे ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनात जोरदार स्फोट झाल्याची घटना घडली आहे. गंगापूर रोड येथील शांतिनिकेतन चौकात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

सिलेंडरचा हा स्फोट इतका भयानक होता की त्याच्या हादऱ्यानं आजूबाजूच्या परिसरातील सात ते आठ मजल्यापर्यंत इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. रस्त्यावरील वाहनांच्या काचादेखील फुटल्या आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: खेळाडूंनी सांघिक व समर्पित भावनेतून यशस्वी व्हावे- क्रीडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन सिलेंडर नेणारे वाहन स्पीडब्रेकरवर जोरदार आदळले आणि त्याचवेळी यातील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. या वाहनाच्या मागे असलेल्या कारवरही सिलेंडरचा काही भाग येऊन आपटल्याने कारचेही मोठे नुकसान झाले आहे. 

स्फोट नेमका कुठल्या कारणाने झाला याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. या घटनेत काही लोकं जखमी झाल्याची चर्चा आहे. याठिकाणी अग्निशमन दलसुद्धा दाखल झालं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here