NC

नाशिक: जुन्या वादातून दोन भावांवर प्राणघातक हल्ला

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जुन्या वादातून दोन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना जत्रा हॉटेलजवळ घडली.

राहुल बाबाजी पाटील (वय 29, रा. रासबिहारी लिंक रोड, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की केतन अशोक थोरात (वय 29), अजय अशोक थोरात (वय 27, दोघेही रा. धात्रक फाटा, नाशिक) यांच्यासमवेत मित्राला मेमरी कार्ड देण्यासाठी दि. 27 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जत्रा चौफुलीवर उभे होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर मार्केटमध्ये ‘जादा परताव्याचे’ आमिष; तिघांना तब्बल ९० लाखांचा ऑनलाइन गंडा

त्यावेळी राहुल सुनील खंदारे (वय 24, रा. धात्रक फाटा, नाशिक), आकाश खंदारे व आदित्य खलसे हे तेथे आले आणि “तू मला शिव्या दिल्या होत्या ना?” अशी जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी थोरात भावंडांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 मार्च रोजी विशेष मोहीमेचे आयोजन

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत राहुल खंदारे याला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.  या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०३४६/२०२३), पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790