नाशिक: आंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): महिलेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन बांधकाम साईटवर जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत महिला ही जुना आडगाव नाका परिसरात एका बांधकामाच्या साईटवर काम करून तेथेच कुटुंबासह राहत होती. त्या दरम्यान आरोपी वसिम रहेमतुल्लाह अख्तर (वय २४, रा. सितागुंफाजवळ, पंचवटी) मुळ राहणार बिहार याने एक दिवस ही महिला अंघोळ करत असताना तिच्या नकळत तिचे अश्लिल व्हिडिओ शूट केले. त्यानंतर मार्च ते जून या कालावधीत त्याने या महिलेला हे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला बांधकामाच्या साईटवर तसेच शालिमार येथे एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच या प्रकाराचे अश्लिल व्हिडिओ काढून पुन्हा ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

हे संबंध ठेवले नाही तर पतीसह मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सादर महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपी वसिम अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५४८/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790