Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार.. वाचा सविस्तर…

नाशिक (प्रतिनिधी): मान्सूनच्या परतीमुळे राज्यातील पावसाचा जोर २९ सप्टेंबरनंतर ओसरेल, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे. आज (दि. २८) व उद्या (दि. २९) नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पालघर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, सोलापूर व पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात ठराविक ठिकाणीच व मध्यम पाऊस पडेल. २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत उघडीप असेल. ३ ऑक्टोबरनंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता असल्याचे अंदाजात म्हटले आहे.

दरम्यान, शुक्रवारी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. २४ तासात ३५.८ मिमी पर्जन्य नोंद झाली. राज्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे ११७.६ मिमि झाला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790