नाशिक शहरातून एकाच दिवशी चार दुचाकींची चोरी

नाशिक (प्रतिनिधी): शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणांहून चार दुचाकी चोरी करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना जगताप (रा. पंचवटी) यांची दुचाकी तपोवनरोड येथून चोरी करण्यात आली. बळवंत वाणी (रा. विनयनगर) यांची दुचाकी लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट मंगल कार्यालयाच्या गेटजवळून चोरी करण्यात आली. रवींद्र सिंग (रा. सातपूर) यांची दुचाकी य. म. पटांगण येथून चोरी करण्यात आली. नरेंद्र शिरसाठ (रा. उंटवाडी) यांची दुचाकी त्रिमूर्ती चौक, सिडको येथून चोरी करण्यात आली. पंचवटी, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 10 ऑगस्ट रोजी आयोजन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790