नाशिक (प्रतिनिधी): रिक्षात बसलेल्या प्रवाशाने चालक पापडी घेण्यास खाली उतल्याची संधी साधत रिक्षा आणि स्टेअरींगजवळ ठेवलेला मोबाइल घेऊन पलायन केले. महामार्गावर के. के. वाघ कॉलेजजवळ एका फरसाण दुकानासमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख (रा. आगर टाकळी) यांच्या तक्रारीनुसार, सायंकाळी निमाणी येथून एमएच १५ ईएच २०४७ या क्रमांकाच्या रिक्षाने प्रवाशी घेऊन महामार्गाने जाताना काही प्रवासी के. के. वाघ कॉलेज येथे उतरले. एक प्रवासी विडी कामगारनगरचा असल्याने तो रिक्षात होता. सर्व्हिस रोडने जाताना के. के. वाघ कॉलेजशेजारील फरसाण दुकानात पापडी घेण्यासाठी रिक्षा थांबवली. रिक्षात प्रवासी असल्याने शेख यांनी विश्वासाने चावी व स्टेअरींगजवळ मोबाइल ठेवत ते उतरले. रस्ता ओलांडून दुकानात गेले असता संशयित ४५ वर्ष वयोगटातील प्रवाशाने रिक्षा सुरू करून पळवून नेली. (आडगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ११०/२०२५)
![]()


