नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एमबीबीएससाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष देत युवतीला ३४ लाख ६१ हजारांना गंडा घातल्याप्रकरणी डोंबिवली येथील दोघांच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि विशाखा वानखेडे (रा. कॉलेजरोड) यांच्या तक्रारीनुसार, ओळखीतील संशयित सचिन वामन म्हात्रे (रा.दावडीगाव, डोंबिवली, ठाणे) व कल्पना पाटील (रा. नाशिकरोड) यांनी संगनमत करत २०२२ मध्ये कोल्हापूरच्या डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व्यवस्थापनातील संचालकांशी ओळख असल्याचे सांगत मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले.
युवतीने त्यास होकार दिला. संशयितांनी प्रवेशाकरिता वेळोवेळी ३४ लाख ६१ हजारांची रक्कम घेतली. दोन वर्षे होऊनही प्रवेश मिळत नसल्याने पैसे परत मागितले असता संशयितांनी पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ व दमदाटी केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे.