नाशिक: पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून टोळक्याचा जीवघेणा हल्ला; तीन जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील पेठरोडवरील लक्ष्मणनगर येथे पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून संशयितांच्या जमावाने राडा घातला. या संशयितांच्या टोळक्याने केलेल्या कोयत्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी ७-८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

उदय सुनील चारोस्कर ( २०, रा. लक्ष्मणनगर, भगरे गल्ली, पेठरोड), अंकुश उर्फ पब्या अरुण गायकवाड, बाबू यादव, योगेश प्रकाश यंदे (१९, रा. पालिका बाजार, पेठरोड), राहुल शिवाजी शिंदे (१९, रा. लक्ष्मणनगर, भोरे गल्ली), खेमकुमार अजय यादव (१९, रा. तेलंगवाडी, पेठरोड) यासह दोन अज्ञात संशयित अशी गुन्हा दाखल संशयितांची नावे असून, उदय, योगेश, राहुल, खेमकुमार या चौघांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सायंकाळनंतर सिटीलिंक बस मार्गात बदल; देखावे बघण्यास गर्दी वाढत असल्याने निर्णय

किरण सुभाष जाधव (रा. राहुलवाडी, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जाधव हे विजय कराटे यास भेटण्यासाठी लक्ष्मणनगरमध्ये गेले होते. त्यावेळी मुख्य संशयित उदय चारोस्कर याने संशयितांसह जमावाने येत कराटे यांना, “तू माझ्याविरोधात पंचवटी पोलीसात तक्रार का दिली?”, असे विचारून शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली.

सदरचा वाद सोडविण्यासाठी फिर्यादीसह गौरव रोकडे, आकाश वाक्‌चौरे हे गेले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण व शिवीगाळ केली. तसेच, जीवे ठार मारण्याच्याच उद्देशाने संशयिताने त्याच्याकडील कोयत्याने जाधव यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर संशयित पसार झाले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयितांविरोधात जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:  उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते होणार राज्यातील 434 आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन !

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मुख्य संशयित चारोस्कर याच्यासह चौघांना सोमवारी (ता. ५) अटक केली आहे. किरण सुभाष जाधव, गौरव अरुण रोकडे आणि आकाश भाऊसाहेबी वाकचौरे (सर्व राहणार राहुलवाडी, पेठरोड, पंचवटी) अशी जखमींची नावे आहेत. तिघा जखमींवर उपचार सुरू आहेत. गुन्हयाचा तपास सहायक निरीक्षक रायकर करत आहेत. (पंचवटी पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४४५/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790