नाशिक: अन्न व औषध विभागाकडून 2 लाखांची चहा पावडर जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दिंडोरी येथील मे. नाशिक टी कंपनी या ठिकाणी धाड टाकून दोन लाख रुपये किमतीची विनापरवाना मिथ्या छाप चहा पावडर जप्त करण्यात आली. नाशिक-कळवण रोडवरील बाजार पटांगण दिंडोरी येथील नाशिक टी कंपनी या दुकानावर अन्न औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. त्या ठिकाणी घाऊक चहा विक्रीचा व्यवसाय सुरू होता.

तपासणी अंती ही चहा पावडर साठवणूक तथा विक्रीबाबतचा अन्नसुरक्षा मानके कायद्याअंतर्गत परवाना नसल्याचे आढळले. तसेच त्या ठिकाणी विक्रीसाठी साठविलेल्या चहा पावडरच्या पोत्यावरील लेबलवर कायद्यानुसार आवश्यक मजकूर नव्हता. हा मिथ्याछाप अन्नपदार्थ प्रकारामध्ये मोडते, असे लक्षात आल्याने अन्नसुरक्षा अधिकारी यांनी वरील साठ्यातून दोन नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ५६० किलो चहा पावडर २ लाख १ सहाशे रुपयांची किंमत असलेला साठा जप्त केला.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

या पेढीस परवाना नसल्याने व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त उदयदत्त लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) विवेक पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख व नमुना सहाय्यक विजय पगारे या पथकाने पार पाडली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790