नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकाराने महिलेच्या व्यावसायिक गाळ्यात घुसून कोयत्याचा धाक दाखवून महिलेचा बळजबरीने मंगळसूत्र खेचून नेले. महिलेचा विनयभंग करत पतीला जिवे मारण्याची धमकी देत कंपनीतून त्याचे अपहरण केले व बळजबरीने कोरे चेक लिहून घेत मारहाण केली. याप्रकरणी संशयित सावकार, त्याचा मित्र आणि पाच जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस चौकी अंबड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.
विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, अंबड एमआयडीसीत सुवर्ण लघुउद्योगमध्ये व्यावसायिक गाळा आहे. २०१८ ते २०२५ या कालावधीत पतीने संशयित सावकार नितीन पाटील याच्याकडून व्यावसायासाठी कर्ज घेतले होते. संशयिताने त्यापोटी व्याजासह दंडाची २० लाखांची रक्कम बळजबरीने घेतली आहे. संशयित कर्ज वसुलीकरीता अश्लील शब्दाचा वापर करत धमकी देत आहे. दुकानात असतांना वाईट नजरेने बघून कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने मंगळसूत्र हिसकावून नेले. पैसे दिले नाही तर पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी बळजबरीने तीन लाख ५० हजारांची रक्कम घेत पतीला धमकी देत बळजबरीने खासगी बँकेचे सह्या केलेले २८ कोरे चेक घेतले. व्याजाची रक्कम वसूल करण्याकरिता पतीला कंपनीतून बळजबरीने गाडीत बसवून पाथर्डी फाटा येथे आणून जिवे मारण्याची धमकी देत संशयित आणि त्याचा मित्र तुषार अन्य पाच जणांनी काठीने मारहाण केली. वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे तपास करत आहे. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २४७/२०२५)
वसुलीसाठी गुंडांचा वापर:
शहरात अवैध सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने व्याजाची वसुली सुरू आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांकडून कर्जदारांना धमकी देत वसुली केली जात आहे. यामुळे बहुतांशी तक्रारदार भीतीपोटी पोलिसांत तक्रार करत नाहीत. गुंडांकडून मुलांना, पतीला मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुटुंबीय दहशतीखाली आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790