नाशिक: श्री सप्तश्रृंगी गडावर आजपासून चैत्रोत्सव

नाशिक (प्रतिनिधी): साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर शनिवार (दि. ५) पासून प्रारंभ होत आहे. १२ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतील.

शुक्रवारी (दि.११) यात्रोत्सवातील महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी खान्देशवासीयांसह कसमा पट्ट्यातील लाखो पदयात्रेकरू शेकडो किलोमीटरवर मजल-दरमजल करीत गडावर दाखल होणार आहेत. याच दिवशी दुपारी साडेतीनला न्यासातर्फे ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात येईल. चैत्रोत्सवात लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी दि.४ ते १२ एप्रिलपर्यंत खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. महामंडळाच्या एसटीतून भाविकांसह प्रवासी वाहतूक सुरू राहील.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी ३८५ किमी फायबर नेटवर्क; नाशिकच्या डिजिटल पायाभूत सुविधांना बळ
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790