नाशिक: २४ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील शिवशक्ती चौक भागात राहणा-या २४ वर्षीय परप्रांतीय विवाहितेची गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

कोमल अजितसिंग कश्यप (रा. सरस्वती चौक,शाहूनगर) असे मृत विवाहितेची नाव आहे. कोमल कश्यप यांनी शनिवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात खिडकीला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत सतिश कश्यप यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790