नाशिक: महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पुण्याच्या हिंजेवाडीतून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

निखिल उर्फ स्वप्निल संजय बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, बोराळे मळा, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी (ता. १९) रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास तक्रार केल्याचा राग मनात ठेवून कल्याणी यांना घरात कोंडून घराच्या खिडकी, दरवाजास आग लावली होती. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

मात्र संशयित निखिल सदरच्या घटनेनंतर पसार झाला होता. शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक मिलीदंसिंग परदेशी यांना संशयित निखील पुण्यातील हिंजवडी लपून असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने हिंजवडीत सापळा रचून निखीलला ताब्यात घेतले.

अधिक तपासासाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे, हवालदार महेश साळुंके, नाइक परदेशी, अंमलदार राहुल पालखेडे, चालक समाधान पवार यांनी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790