नाशिक: तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या मुंबईच्या तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या तरुणीला अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणा-या मुंबईच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या या तरुणाने नाशिक शहरातील युवतीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

त्यानंतर त्याने अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कारासह आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नावेद अन्सारी (२३ रा. मालवणी चर्च जवळ मालाड,मुंबई ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात प्रेमसंबध आहेत. सन.२०२१ मध्ये संशयिताने पीडितेस लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने शहरात येऊन पीडितेस लॉजवर घेवून जात बलात्कार केला.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

यावेळी संशयिताने दोघांचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढले. तरूणीने आता लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790