नाशिक: पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले

नाशिक (प्रतिनिधी): पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले. तलाठी कॉलनी ते राजमाता लिंकरोडवर हा प्रकार घडला. पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुवर्णा गुंजाळ (रा. मानेनगर) यांच्या तक्रारीनुसार, तलाठी कॉलनीमधील नातेवाइकांचा मांडवाचा कार्यक्रम आटोपून घरी पायी जात असताना तलाठी कॉलनी ते राजमाता लिंक रोडने पांढऱ्या रंगाच्या मोपेडहून आलेला क्रिम रंगाचे जॅकेट घातलेला एकजण समोरुन आला. अचानक गाडी थांबवून गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र खेचून अमृतधामच्या दिशेने फरार झाला.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हा बँकिंग रोडमॅप: सर्वसमावेशक विकासासाठी १० धोरणात्मक स्तंभ
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790