नाशिक: बळी देण्याची भीती दाखवत भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार; ५० लाख उकळले, गुन्हा दाखल

नाशिक, १५ नोव्हेंबर २०२५: कुटुंबातील सदस्यांचा बळी देण्याची भीती दाखवत एका भोंदूबाबाने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आणि तिच्या कुटुंबाची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी संशयित गणेश जयराम जगताप (रा. कामाख्या मंदिर परिसर, धारणगाव खडक, ता. निफाड) याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला संशयित जगताप याने ‘बाबागिरी’च्या नावाखाली विधी करण्यासाठी महिलांची मदत आवश्यक असल्याचे सांगत तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तिच्या पतीला मद्यपानाचे व्यसन लागले असून ते सोडविण्यास मदत करू, असा विश्वास निर्माण केला. या बहाण्याने त्याने फिर्यादीशी जवळीक वाढवली.

दरम्यान, “तू मला खूप आवडतेस आणि तुला मिळवण्यासाठी मी स्मशानभूमीत विशेष पूजा करतो,” असे सांगत त्याने पीडितेला एक पुस्तक दाखविले. त्या पुस्तकात फिर्यादी, तिचा पती आणि मुलांची नावे लिहिलेली होती. ही नावे दाखवत, “तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर या पुस्तकातील कुणाचा तरी जीव जाईल,” अशी धमकी देत आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा अत्याचार केला.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

याच कालावधीत विविध कारणे सांगत त्याने फिर्यादीच्या कुटुंबाकडून सुमारे ५० लाख रुपये उकळले. हा संपूर्ण प्रकार २०१० ते २०२५ या काळात पाथर्डी गावातील गौळाणे रोड परिसरात घडल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

इंदिरानगर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, फसवणूक आणि धमकावणे यांसह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त बारी करत आहेत. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३८३/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790