नाशिक। दि. ४ ऑक्टोबर २०२५: मखलमाबाद येथे गेमिंग झोनमध्ये सहा संशयितांनी पॉइंट चुकीच्या पद्धतीने वाढविल्याच्या कारणातून गेमिंग झोन को-ऑर्डिनेटरच्या नाकावर हातोडा मारत गंभीर जखमी केले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करून फरार झालेल्या संशयिताच्या मागावर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मुंबईपर्यंत माग काढण्यात आला असल्याची माहिती पथकाने दिली आहे.
अतुल भाकरे यांनी तक्रार दिली. ते एका गेम झोनमध्ये को-ऑर्डिनेटर आहेत. रात्री ९.४५ वाजता गेम खेळणारा एकजण त्यांच्या जवळ आला. माझे पॉइंट चुकीच्या पद्धतीने वाढवले आहेत, असे त्याने सांगितले. भाकरे यांनी सिस्टिममध्ये काय आहे ते बघा, असे सांगितले. मात्र त्याचा राग आल्याने संशयिताने शिविगाळ करत मारहाण केली. प्लास्टिकचा लोखंडी हातोडा नाकावर मारून भाकरे यांना गंभीर जखमी केले.
हा प्रकार बघून संशयिताच्या पाच मित्रांनीही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि कारमधून पसार झाले. संशयितांच्या मागावर पथक असून संशयित मुंबईकडे पळून गेले असावेत, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिली आहे.
![]()


