NC

नाशिक: कॉलेजच्या रकमेचा बँकेत भरणा न करता कर्मचारी महिलेने केला परस्पर अपहार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अशोक स्तंभ परिसरातील सार्थक पॅरामेडिकल कॉलेजच्या रकमेचा बँकेत भरणा न करता कर्मचारी महिलेने परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेत सुमारे ३ लाख ९० हजार रूपयांचा अपहार करण्यात आला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर मार्केटमध्ये ‘जादा परताव्याचे’ आमिष; तिघांना तब्बल ९० लाखांचा ऑनलाइन गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी सुनिल नागरे (२३ रा.सायखेडा ता.निफाड) असे संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत राज सुकदेव निकम (रा.जलालपुर,आनंदवली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

निकम अशोक स्तंभ परिसरातील सार्थक पॅरामेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. या कॉलेजमध्ये संशयित महिला नोकरीस होती.

१ डिसेंबर २०२२ ते २० जुलै २०२३ दरम्यान संशयित महिलेकडे कॉलेजच्या रक्कम भरणा करण्यासाठी दिली असता हा प्रकार घडला. संशयित महिलेने बँकेत भरणा न करता पैसे भरणा केल्याची पावती सादर केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विश्व मराठी संमेलनानिमित्त दुमदुमली कुसुमाग्रजांची नगरी; शोभायात्रेत विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांचा सहभाग

मात्र तपासणीत बँकेत सुमारे ३ लाख ९० हजार ५०० रूपये भरणा करण्यात आले नसल्याबाबत समोर आल्याने हा प्रकार पुढे आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790