नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एकलहरा गेट जवळील नवीन सामनगाव येथे शरीर सुखाच्या मागणीसाठी भाच्यानेच मामीचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून करत भाच्याने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून बनाव करण्याचा प्रयत्न तपासामध्ये उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली.
एकलहरा गेट नवीन सामनगाव येथे सुदाम रामसिंह बनोरिया हा पत्नी क्रांती (२७), मुले आयुष (७), खुशी (४), पियुष (२) यांच्यासह राहत असून सुदामा हा एकलहरा गेट येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. वर्षभरापासून सुदाम याचा भाचा अभिषेक राजेंद्र सिंह (२२) हा राहण्यास असून तो देखील एकलहरा सामनगाव परिसरात गल्लोगल्ली फिरून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो.
बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जखमी अभिषेक याच्या ओरडण्यामुळे शेजारी राजेंद्र पाटील घराजवळ गेले असता विवाहिता क्रांती ही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. भाचा अभिषेक याच्या गळ्यावर वार व रक्तस्त्राव झाल्याने तो बोलू शकत नसल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घरात सुदाम यांची तीनही मुले झोपलेली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून खाटेवर रक्ताने माखलेला चाकू जप्त केला होता.
खुनाचा खनाचा संशय येऊ नये म्हणून अभिषेक याने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून पोलिसांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र अभिषेकने स्वतःच्या गळ्यावर चाकूने मारून घेताना जास्त प्रमाणात लागल्याने त्याची प्रकृती अद्याप गंभीर असून त्याला बोलता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिषेक घरी आला तेव्हा सुदाम याची दोन मुले झोपलेली होती. तर चार वर्षाची मुलगी खुशी ही जागी होती. तिने अभिषेक व आई क्रांती यांच्यात झालेले भांडण व त्यानंतर अभिषेकने केलेला चाकू हल्ला बघितल्याचे पोलिसांना सांगितले, झोपलेल्या मुलांनी उठू नये म्हणून अभिषेकने त्यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारल्याचे तपासात उघडकीस आले.
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला जखमी भाचा अभिषेक बोलत नसल्याने पोलिसांनी त्याला लेखी प्रश्न विचारून त्याच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्याने रात्री साडेनऊ पावणेदहा वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर मामी क्रांती हिच्यासोबत शरीर सुखाच्या मागणीवरून भांडण झाल्याचे सांगितले.
क्रांती हिने नकार दिल्याने अभिषेक याने आपल्या सोबत आणलेल्या चाकूने क्रांती हिचा गळा चिरून निघृण खून केल्याची कबुली दिली.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790