नाशिक: सातपूर गोळीबार प्रकरणी फरार सराईत आरोपीस मीरा भाईंदर येथून अटक

नाशिक। दि. २१ ऑक्टोबर २०२५: सातपूरच्या हॉटेल ऑरा गोळीबार प्रकरणात फरार निखिल निकुंभ याला अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मिरा भाईंदर (ठाणे) येथे ही कारवाई केली.

पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस नाईक भुषण सोनवणे यांना पाहीजे आरोपी निखीलकुमार मधुकर निकुंभ हा मिरा भाईंदर, ठाणे येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाली. वरीष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ठाणे येथे शोध घेत संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताला सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

संशयिताला गुन्हे शाखा युनिट १ च्या कार्यालयात हजर करण्यात आल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला जयघोष करत न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २४ पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कामगीरी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, पोलीस नाईक भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारूदत्त निकम, व मपोअं. सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे. सदरची कामगिरी करतांना मोलाचे सहकार्य मसपोनि तारडे मॅडम व त्यांचा तांत्रिक विश्लेषण कडील स्टाफ यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम आज (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार SIR चा आढावा

लोंढे पिता-पुत्रांना कोठडी:
गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक लोंढे या पिता-पुत्राचा न्यायालयाच्या आदेशाने अंबड पोलिसांनी ताबा घेतला. दोघांना न्यायालयात हजर केले असता २३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.अंबड पोलिस ठाण्यात दाखल बंगला बळकावणे, खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकीच्या गुन्हात दोघांचा ताबा घेतला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790